वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.
विवेक परब | ब्यूरो चीफ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जि का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, नगरसेवीका साक्षी पेडणेकर, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसीका मठकर, सुनील मठकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)