ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या कार्यशाळेला प्रारंभ.

एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या कार्यशाळेला प्रारंभ.

प्रकाशन: 14 Apr 2023 03:00 PM
वाचन संख्या 47

पालक-विद्यार्थ्यांना बळ देणारी बुध्दिबळ कार्यशाळा : निकेत पावसकर

संतोष साळसकर | सहसंपादक : सुप्रसिद्ध एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना भविष्यात योग्य दिशा दिली आहे. त्यांची बुध्दिबळ ही वेगळी कार्यशाळा अनेक पालक आणि विद्यार्थी यांना बळ देत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यासाठी निश्चितपणे  बुध्दीबळ कार्यशाळा एकदातरी केली पाहिजे, असे प्रतिपादन संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर यांनी केले. 

तळेरे येथील एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या २० दिवशीय बुध्दिबळ या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन निकेत पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ उपस्थित होते. 

या कार्यशाळेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दररोज दृकश्राव्य माध्यमातून ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये अभ्यासाची सायंटिफीक पध्दत शिकवली जाणार असून अभ्यासाचा स्पीड कसा वाढवायचा, कठिण अभ्यासही सहज लक्षात कसा ठेवायचा, तिन चार अंकी गुणाकार सेकंदात कसा सोडवायचा, डीप्रेशनमधुन बाहेर कसे पडायचे आणि जिंकण्यासाठी आत्मविश्वास कसा निर्माण करायचा यासारख्या अनेक मुद्द्यांवर यामध्ये मार्गदर्शन करुन तसे प्रात्यक्षिक घेतले जाते. आजपर्यंत सदाशिव पांचाळ यांचे एक हजार कार्यक्रम महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यात झाले आहेत. तसेच, त्यांच्या मुलाखती आकाशवाणी केंद्र आणि सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झाली आहे. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स