सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ले- म्हापण जि.प.मध्ये 'महाविजय २०२४ अभियान' अंतर्गत मेळावा संपन्न.
विवेक परब | ब्यूरो चीफ : भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय २०२४’ अंतर्गत जनसंपर्क अभियान १२ एप्रिलला म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ, परुळे येथे संपन्न झाले. श्री देवी वराठी मंगल कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान घेण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना(बाळू) देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणीस माजी सभापती निलेश सामंत, महीला मोर्चाच्या माजी सभापती वंदना किनळेकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, परुळे उपसरपंच राजू दूधवडकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, कुशेवाडा उपसरपंच महादेव सापळे, शक्ती केंद्रप्रमुख रुपेश राणे, सुनील चव्हाण, बूथ अध्यक्ष अण्णा सावंत, गणपत माधव, संदेश पवार, साई मांडये, प्रकाश चव्हाण, अण्णा मांडये, प्राजक्ता चिपकर, रक्षिता गोवेकर, सीमा सावंत, सुवर्णा सावंत, विठोबा राणे, ममता परुळेकर, भद्रायू परुळेकर, आनंद गावडे, प्रवीण ठाकूर, सुधीर पेडणेकर, प्रणव वा्यंगणकर, प्रदीप गवंडे, पूजा माडये, सिद्धेेश माडये यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी तर्फे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण विजयाची तयारी यावेळी स्पष्ट करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद पाटकर यांनी केले तर आभार कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)