देवबाग येथे उद्या 'महानिद्रा' नाटकाचा प्रयोग ; श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिना
निमित्त उद्या १२ एप्रिलला रात्री १० वाजता ‘श्री माऊली
प्रतिष्ठान पाट पंचक्रोशी’ यांचे रामकृष्णहरि प्रकाशित,लंबोदर प्राॅडक्शन मुंबई प्रस्तुत, विनय केळुसकर लिखित व दिग्दर्शीत दोन अंकी नाटक ‘महानिद्रा’ सादर होणार आहे.
या नाटकाची निर्मिती डी.टी.मेथर व महेश पाटेकर यांची असून नेपथ्य रविराज धुरी, पार्श्व संगीत रत्नाकर पडते यांचे आहे. आयोजक मंडळाने सर्वांना जास्तीत जास्त उपस्थीतीचे आवाहन केले आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)