मालवणात टळला अनर्थ ; माजी नगरसेवक व बांधकाम सभापती यतीन खोत यांची सामाजीक तत्परता.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या नगरपरिषद समोरील ‘वझे वळण’ येथे आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुख्य वीज वाहिनीला वार्यामुळे झाडाच्या फांदीचा स्पर्श होऊन आग लागली. ही घटना मालवणचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांना समजल्यानंतर त्यांनी लगेचच वीज वितरण कर्मचारी व नगरपरिषदेचे अग्नीशमन कर्मचारी वर्गाला त्याची कल्पना दिली.
नगरपरिषदेचे आनंद वळंजू, वैभव वळंजू, सागर जाधव, नितीन शिर्सेकर,सुनील गरगटे यांनी तत्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले तर महाविरणचे कर्मचारी गणेश देऊलकर व सिद्धेश गावडे यांनी खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केला व पुढील अनर्थ टळला.
या संपूर्ण घटनेनंतर मालवणच्या नागरिकांकडून माजी नगरसेवक यतीन खोत व संबंधित सर्वांची प्रशंसा होत आहे.
( फोटो सौजन्य : मालवण ब्यूरो)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)