ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
परीक्षांच्या पद्धतीत राष्ट्रीय व राज्य पातळीवर होणार मोठे फेरबदल ; नवीन शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा तयार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

परीक्षांच्या पद्धतीत राष्ट्रीय व राज्य पातळीवर होणार मोठे फेरबदल ; नवीन शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा तयार.

प्रकाशन: 10 Apr 2023 12:12 PM
वाचन संख्या 143

मुंबई | ब्यूरो न्यूज : देशातील दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळवले जाणार आहेत आणि सोबतच सीबीएसई सारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून बारावीची परीक्षा दोनदा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी नवीन शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा सरकारने तयार केला आहे.

या तयार मसुद्यात अनेक प्रकारच्या नवीन शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवीन मूल्यांकन पद्धती विकसित केल्या जाणार आहेत. तर पदवीच्या अभ्यासक्रमातही मोठे बदल केले जाणार असून, नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे मुभा मिळणार आहे. या नव्या शिफारशीत देशभरात वर्ष २०२३-२४ च्या दहावी बारावीच्या परीक्षेपासून सीबीएसई मंडळाच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल केले जाणार आहेत. त्यात लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून, सुमारे ५० टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल.

दुसरीकडे राज्यातही बारावीच्या परीक्षा या वर्णनात्मक व वैकल्पिक अशा दोन पद्धतीने होऊ शकतील. सरकार त्यावर येत्या काळात निर्णय घेईल. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्यावर सूचना मागण्यात येतील. दहावीमध्ये एकूण प्रश्नांपैकी ५० टक्के प्रश्न बहुपर्यायी असतील. एखाद्या घटनेवर किंवा इतर कोणत्याही समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातील. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग केवळ वीस टक्के, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यंदा ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. तर दुसरीकडे बारावीत ४० टक्के व प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. एकात्मिक स्वरूपाचे व केस स्टडीवर आधारित प्रश्न विचारले जातील. लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण यंदा ४० टक्क्यांवर आणले आहे.

नववी, अकरावीच्या परीक्षेतही बदल
नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून, लघु आणि दीर्घ प्रश्न प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे. लघु आणि दीर्घ प्रश्न उत्तराच्या एकत्रित प्रश्नांना ५० ऐवजी चाळीस गुण असतील असे सीबीएसई मंडळाने म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 450

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स