ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कणकवली नगरपंचायत बसविणार सेप्टिक व्हेंट पाईप जाळी...

कणकवली नगरपंचायत बसविणार सेप्टिक व्हेंट पाईप जाळी...

प्रकाशन: 02 Oct 2021 02:26 PM
वाचन संख्या 42

डास फैलाव रोखण्यासाठी नगरपंचायतचा नामी उपाय…!

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे यांची माहिती

कणकवली | उमेश परब : डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कणकवली नगरपंचायत च्या वतीने नामी शक्कल लढविण्यात आली असून कणकवली नगरपंचायत च्यावतीने शहरातील 5 हजारहून अधिक सेप्टिक टँकवर व्हेंट पाईप जाळी बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे यांनी दिली. पावसाळ्यात पाण्याची डबकी साचून मच्छरांची पैदास वाढते. त्यापेक्षाही शौचालयांमध्येही मच्छरांची पैदास जास्त होते. शहरात मच्छरांची पैदास होऊ नये यासाठी उघड्या जागेवरील डबकी, आणि गटारांमध्ये फवारणी करून डास निर्मिती रोखण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सेप्टिक टॅंक मधून बाहेर पडणाऱ्या डासांवर आता नामी उपाय काढण्यात आला आहे. शौचालय टाकीवर बसवलेल्या व्हेंट पाईप मधून मच्छर बाहेर पडतात. यावर नामी उपाय म्हणून शहरातील 5 हजार हुन अधिक सर्व सेप्टिक टँकला कणकवली नगरपंचायत च्या वतीने मोफत व्हेंट पाईप जाळी बसविण्यात येणार आहेत.

या जाळीमुळे व्हेंट पाईपमधून बाहेर पडणारे डास जाळीतच अडकून पडतातआणि कालांतराने मरतात . त्यामुळे सेप्टिक टॅंक मधून बाहेर पडणाऱ्या डासांवर आपोआपच निर्बंध येतात. साहजिकच त्यामुळे डासांमुळे होणारे तापासारखे साथरोग आटोक्यात येऊन शहरातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे. व्हेंट पाईप जाळी बसविण्यासाठी येणारे कामगार प्रत्येक सेप्टिक टॅन्कचा सर्वेही करणार आहे. ज्या नागरिकांच्या वैयक्तिक घराचा अथवा निवासी किंवा व्यावसायिक इमारतीचा सेप्टिक टॅंक नादुरुस्त असेल तर तशी नोंद नगरपंचायत मध्ये केली जाणार आहे. तसेच नगरपंचायत च्या वतीने संबंधित प्रॉपर्टी मालकास सेप्टिक टॅंक तात्काळ दुरुस्त करून घेण्याविषयी कळविण्यात येणार आहे. जेणेकरून नादुरुस्त सेप्टिक मधून होणार डास फैलाव रोखला जाऊ शकेल. व्हेंट पाईप जाळी मुळे शहरातील डास फैलाव रोखून कणकवलीवासीयांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स