डेगवें येथे श्री रामनवमी उत्साहात संपन्न
बांदा /राकेश परब: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री राम मंदिरात काल मोठ्या भक्तीमय वातावरणात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम सकाळी श्री राममंदिरातील सर्व मुर्तीना दुग्धाभिषेक करण्यात आला.व विधीवत पुजा केली.संपूर्ण मंदिरात विद्युत रोषणाई केली होती.दुपारी १२.०० श्रीराम यांना पाळण्यात घातले.या वेळी गावातील स्त्रियांनी पाळणा गीत म्हटले.
विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गावातील भजनप्रेमी मंडळाने भजने सादर केली. डेगवे गावातील भाविकांनी श्रीराम मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ मोठ्याप्रमाणात घेऊन तिर्थप्रसादाचा लाभ घेतला.संपूर्ण परीसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले होते .सदर कालच्या कार्यक्रमास गावातील लोकांनी व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वाचे सहकार्य लाभले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)