ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
विश्व हिंदू परिषद वेंगुर्ला प्रखंडात राम नवमीचा ज्ञान जागर...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विश्व हिंदू परिषद वेंगुर्ला प्रखंडात राम नवमीचा ज्ञान जागर...!

प्रकाशन: 31 Mar 2023 02:29 PM
वाचन संख्या 43

चिंदर/विवेक परब: हिंदू जनमानसात प्रभू श्री रामांन विषयी असलेली आस्था सर्वश्रुत आहे. सारा देश राम नवमीला राम नाम रूपी अमृताचा आस्वाद घेत असतो. भजन पूजन कीर्तनातून राम नामाचा जागर अखंड हिंदुस्तानात होत असतो. विश्व हिंदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्या वतीने ‘मंत्री’राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री मारुती स्तोत्र व श्री राम रक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आले. तालुकास्तरीय अशा या स्पर्धेत सुमारे ४५ शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या गटातील विद्यार्थ्यांना श्री मारुती स्तोत्राचे पठण करावयाचे होते. या स्पर्धेचे परीक्षण निवृत्त शिक्षक अजित राऊळ व रत्नप्रभा प्रभू साळगावकर यांनी केले. या स्पर्धेत प्रसन्ना नारायण बर्वे या विद्यार्थ्याने प्रथम, कृपा निलेश बांदवलकर हिने द्वितीय, तर शर्व बाबुराव आपटे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. अंकुर वामन गावडे व प्रणव गजानन केसरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. श्री राम रक्षा पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक साईराज विनय सामंत याने पटकावला तर द्वितीय क्रमांक साठी प्रथा राघवेंद्र जोशी हिची निवड करण्यात आली. या स्पर्धेत छोट्या गटातील प्रसन्ना नारायण बर्वे याने श्री राम रक्षा स्तोत्राचे सफाईदार सादरीकरण करून परीक्षकांची व श्रोत्यांची शाबासकी मिळविली .या स्पर्धेचे परीक्षण ॲड . सुषमा प्रभू खानोलकर व अजित राऊळ सर यांनी केले. प्रथम क्रमांकाला रुपये ४०० रोख, प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकाला रुपये ३०० रोख व प्रशस्तीपत्र तृतीय क्रमांकाला रुपये २०० रोख व प्रशस्तीपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रुपये १०० रोख आणि प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. विश्व हिंदू परिषद वेंगुर्ला प्रखंडाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा हायटेक कॉम्प्युटर्सचे संचालक गणेश अंधारी यांच्यातर्फे प्रायोजित केली होती. शिवाय सर्वच सहभागी स्पर्धांना प्रशस्तीपत्रक पेन स्केच पेन अशा भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या ४८ साधिकांनी सामुदायिक रित्या श्री रामरक्षा स्तोत्र, श्री मारुती स्तोत्र सुस्वराने सादर करून उपस्थितांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला. कार्यक्रमासाठी सर्व सोयींनी युक्त स्थळ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम मंत्री दांपत्याने केले. शिवाय प्रत्येक उपस्थिताला अल्पोपाहाराने तृप्त केले. बक्षिस वितरण समारंभास रामेश्वर मंदिर देवस्थानचे बुजुर्ग मानकरी रवींद्र जी परब , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटनीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला प्रखंडाचे अध्यक्ष अरुण गोगटे, मंत्री आप्पा धोंड. रा.स्व.संघाचे बाबुराव खवणेकर सर व मंदार बागलकर आदी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स