ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महेश इंगळें प्रमाणे प्रथमेशनेही धाडसी जीवनाची दिशा आत्मसात करावी!

महेश इंगळें प्रमाणे प्रथमेशनेही धाडसी जीवनाची दिशा आत्मसात करावी!

प्रकाशन: 31 Mar 2023 09:31 PM
वाचन संख्या 34

ह.भ.प.योगीराज महाराज वटवृक्ष मंदिर समितीच्या सेवेकऱ्यांकडूनही प्रथमेश इंगळेंचा सन्मान

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: जो मनुष्य या जीवनाला सकारात्मक विचारसरणीची जोड आपल्या जीवनाला देवून नित्य सातत्यपुर्ण दिनचर्येचे सुसंस्कृत जीवन जगतो त्या व्यक्तीस धाडसी जीवनाचे दैवी शक्तीचे वरदान लाभते. योगायोगाने आज हे सर्व गुण येथील मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी अंगीकारल्याने नित्यपणे सातत्यपूर्ण दिनचर्येची परीसीमा आखून जीवन जगत असल्याने त्यांच्या अंगी कौशल्य व धाडसी जीवनाचे कसब आहे. त्यांना या दैवी शक्तीचे वरदान लाभलेले आहे. आज त्यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे हे आत्ताच वयात येत आहेत. प्रथमेश याने त्यांचे वडील महेश इंगळे प्रमाणे धाडसी जीवनाची कास तरुण वयापासूनच जोपासावी व त्याचे सातत्य वडिलांप्रमाणे राखावे याकरिता स्वामी समर्थांचे व आमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.वडीलां प्रमाणे त्यानेही आता धाडसी जीवनाची दिशा आत्मसात करण्यास सुरुवात करावी असे प्रतिपादन औरंगाबादचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.योगीराज महाराज यांनी केले. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अतिथी कक्षात अध्यक्ष महेश इंगळे व विश्वस्त मंडळींच्या उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त ह.भ.प. योगीराज महाराजांनी प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. केक कापून वाढदिवसाच्या आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी ह.भ.प. योगीराज महाराज बोलत होते.याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंगेश फुटाणे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, नितीन दिवाकर, प्रवीण घाटगे, सागर गोंडाळ, स्वामीनाथ लोणारी, गणेश क्षीरसागर, गिरीश पवार, सचिन हन्नूरे, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीपाद सरदेशमुख, काशिनाथ इंडे इत्यादी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स