ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणच्या महिलांनी निमंत्रित महिलांच्या कबड्डी स्पर्धेत मारली बाजी ; पुरुषांच्या स्पर्धेत पंचक्रोशी फोंडा विजेता.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणच्या महिलांनी निमंत्रित महिलांच्या कबड्डी स्पर्धेत मारली बाजी ; पुरुषांच्या स्पर्धेत पंचक्रोशी फोंडा विजेता.

प्रकाशन: 23 Mar 2023 04:54 PM
वाचन संख्या 395

डांगमोडेतील नवतरुण मित्रमंडळ आयोजीत कबड्डी स्पर्धा.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी फोंडा कबड्डी संघाने लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचा २३ – ४ असा पराभव करून १९ गुणांनी विजय संपादन केला.

महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेत मालवण महिला कबड्डी संघाने देवगड महिला कबड्डी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण १८संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक कलेश्वर नेरुळ कबड्डी संघ व चतुर्थ क्रमांक रेवतळे मालवण कबड्डी संघाने पटकावला. विजेत्या एक ते चार संघांना रोख ७०००, रुपये ४००० रोख रुपये व प्रत्येकी १५०० आणि कैलासवासी शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात आले.

या स्पर्धेमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश घाडी, उत्कृष्ट पकड दीपक काळे, उत्कृष्ट चढाई सुयोग राजापकर, व शिस्तबद्ध संघ म्हणून शिवमे प्रतिष्ठान सावंतवाडी संघाची निवड करण्यात आली.

या सर्वांना रोख रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून हेमंत गावडे, प्रथमेश नाईक, दाजी रेडकर, नितीन हडकर, हेमंत तावडे, महेश सावंत, राजेश गोवेकर आणि गुणलेखक म्हणून महेश सावंत, राजेश गोवेकर यांनी काम पाहिले बक्षीस वितरण प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, बिळवस सरपंच मानसी पालव, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकूर, सोमा ठाकूर,हरी ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश ठाकूर, मंगेश ठाकूर, कल्पना ठाकूर, परेश ठाकूर, बापू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, गार्गी चव्हाण, अनिल ठाकूर, पूजा ठाकूर, पंकज ठाकूर,मंगेश चव्हाण, परशुराम ठाकूर, बाबू ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, संचित ठाकूर, विकास ठाकूर, संकेत ठाकूर, परशुराम चव्हाण आणि नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पंकज वर्दम, मंदार केणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष हरी खोबरेकर, बाबू आंगणे, पिंट्या गांवकर,बाळा आंगणे आणि डांगमोडे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ प्रकाश ठाकूर व आभार ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स