ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी..!

प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी..!

प्रकाशन: 23 Mar 2023 08:11 PM
वाचन संख्या 281

श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने अक्कलकोट दुमदुमले .

मसुरे | प्रतिनिधी : जगातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मूळस्थान)श्री क्षेत्र अक्कलकोट येथे आज गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला.

पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणे करिता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण सोहळा, त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मुर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रीं चा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळेंच्या हस्ते, मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या वतीने श्रींची आरती संपन्न होवून भजनगीत, पाळणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला. स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. मंदीरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन प्रसाद ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले. दुपारी स्वामी प्रकट दिनानिमित्त देवस्थाने रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. देवस्थानच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला.आज गुरुवार व स्वामींचा प्रकट दिन असा दुग्ध शर्करा योग साधून आलेला स्वामींच्या प्रकट दिन दिवशी दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.

आज प्रकट दिनानिमित्त रात्रीची शेजारती व दर गुरुवारी होणारा मंदिरातील पालखी सोहळा झाला नाही. श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा-प्रभात फेरीस आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरती पूर्वी सुरुवात झाली. आज स्वामी प्रकट दिनानिमीत्त तालुक्याचे मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजेसाहेब व कुटुंबीय, धर्मादाय आयुक्त मुख्य कार्यालय मुंबईचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त मनीषा पाटील, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी,
औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही.भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरुप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख,
रामचंद्र समाणे, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रवि मलवे, शंकर पवार, अरविंद कोकाटे, सचिन पवार, बसवराज आलमद, सातलिंगप्पा आलमद, लखन गवळी, श्रीकांत मलवे
सुरेखा तेली, कौशल्या जाजू, कृष्णाबाई घाटगे, पूजा साळुंखे, श्रावणी पवार, सुवर्णा जाधव, कल्याणी पाटील, प्रेरणा कासेगावकर, सीमा देगावकर, मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स