ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सेवांगणच्या आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे मानकरी म्हणून टी. के. पाटील व विजय गांवकर यांची निवड ; माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष पुरस्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सेवांगणच्या आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे मानकरी म्हणून टी. के. पाटील व विजय गांवकर यांची निवड ; माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष पुरस्कार.

प्रकाशन: 21 Mar 2023 07:56 PM
वाचन संख्या 337

२५ मार्चला दुपारी ३ वाजता सेवांगण कट्टा येथे प्रदान होणार पुरस्कार.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या वतीने २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सेवांगण कट्टा येथे प्रदान करण्यात येत आहेत.
सौ. हि. भा. वरसकर विद्यालय वराडचे मुख्याध्यापक टी. के. पाटील व भ. ता. चव्हाण मा. विद्यालय चौके मुख्याध्यापक विजय गांवकर याना मधु दंडवते स्मृति आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
टी. के. पाटील यांनी वराड हायस्कूल मध्ये सहा. शिक्षक म्हणून २१ वर्ष सेवा केली असून गेली १५ वर्ष ते मुख्याध्यापक आहेत.

विजय गांवकर हे भ. ता. चव्हाण म मा विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहात आहेत. त्यानी शिक्षण शास्त्रात एम ए केले असून गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका जिल्हा व राज्य स्तरावर मार्गदर्शन केले आहे. पुरस्कार वितरण
वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक व काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ॲड देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली
२५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सेवांगण कट्टा येथे आयोजित केला आहे.
त्या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन किशोर शिरोडकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, विकास म्हाडगुत, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड यानी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स