ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
चिपळूण येथे पर्यटन कार्यशाळा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन; विष्णू मोंडकर
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चिपळूण येथे पर्यटन कार्यशाळा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन; विष्णू मोंडकर

प्रकाशन: 18 Mar 2023 07:27 PM
वाचन संख्या 147

पर्यटन विभाग भारत सरकार आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

विवेक परब | ब्युरो चीफ : कोकणाच्या पर्यटनदृष्टया शाश्वत विकासासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न चालू असून कोकणातील जलक्रीडा, न्याहरी निवास, कृषी पर्यटन, कल्चर टुरिझम, मेडिकल, हिस्ट्री टुरिझम क्षेत्रात कार्य करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या शासकीय नियमावली मध्ये बदल तसेच शासन व पर्यटन व्यावसायिक यांच्यात कोकण प्रांतात पर्यटन व्यवसाय वाढीसाठी समन्वयाचे भाग म्हणून भारत सरकारच्या पर्यटन विभागाचे आदरातीथ्य आणि पाहुणचार या विषयावर १९ मार्च २३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत एकदिशीय कार्यशाळेचे आयोजन माउली हॉल चिपळूण येथे येथे करण्यात आले असून उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून श्री.प्रमोदजी जठार, आमदार किरण सामंत सिंधुरत्न योजना सदस्य महाराष्ट्र यांची उपस्थिती असणार आहे या पद्धतीची कार्यशाळा महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती त्यांमध्ये पर्यटन व्यावसायिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता सदर कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात असलेल्या संधी, शासकीय योजना यांची माहिती दिली जाणार असून कोकणातील जास्तीत जास्त पर्यटन व्यवसायिकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णु(बाबा) मोंडकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स