ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्लेत दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड  ( UDID ) शिबीराचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्लेत दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड  ( UDID ) शिबीराचे आयोजन.

प्रकाशन: 13 Mar 2023 02:16 PM
वाचन संख्या 59

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्थेचा पुढाकार.

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार  १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वेंगुर्ले तालुक्यातील दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड  ( UDID ) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  
वेंगुर्ले तालुक्यातील दिंव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड मिळविण्यासाठी ओरस येथील  जिल्हा रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात. तसेच दिव्यांगांना तिकडे जाण्यासाठी सोबतीला कुणालातरी घेऊन जावे लागत असल्याने ही बाब खर्चीक असल्याने बरेच दिंव्यांग हे स्वावलंबन कार्ड पासुन वंचित आहेत. त्यामुळे दिंव्यांग असुनही त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही. याकरिता वेंगुर्ले तालुक्यामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वेंगुर्ले तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे.
  
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे व भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.नागरगोजे यांची भेट घेऊन वेंगुर्ले येथे शिबीर घेण्याची मागणी केली. यावेळी शिबीरासाठी लागणारे डाॅक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले, तसेच शिबिरास सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील, वाचा उपचार तज्ञ डाॅ.श्रीधर पोवार, डाॅ.भगत उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शामसुंदर लोट, दिक्षा तेली, प्रकाश वाघ, स्वाती राऊळ, प्रशांत केळुसकर, नीलम राणे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स