ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोणाच्याही हातातल्या बाहुल्या बनून राहू नका ; अभिनेत्री अक्षता कांबळी यांचे समस्त महिला वर्गाला आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोणाच्याही हातातल्या बाहुल्या बनून राहू नका ; अभिनेत्री अक्षता कांबळी यांचे समस्त महिला वर्गाला आवाहन.

प्रकाशन: 13 Mar 2023 11:04 AM
वाचन संख्या 65

मालवण | सुयोग पंडित : समाजातील सर्व महिलांनी व युवतींनी स्वसक्षम झालेच पाहिजे आणि कोणाच्याही हातची बाहुली बनून राहू नये असे आवाहन सुप्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्रात’ १० मार्चला रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कामगार व कामगार कुटुंबीय अशा ८ महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या वेळी त्या संबोधीत करत होत्या.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळी होत्या . विशेष अतिथी माजी नगरसेविका नीलम पालव ,नगरसेविका कविता राणे,दीपा सरूडकर, दिव्या साळगावंकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली . उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले. कामगार कल्याण चे सर्वेसर्वा संतोष नार्वेकर हे तळागाळातील सकारात्मक क्रीयाशील महिला शोधून त्यांच्या कार्याचा गौरव करतात म्हणून अक्षता कांबळी यांनी नार्वेकर यांचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .उपस्थित इतर मान्यवर व सत्कारमुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स