ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी केला विशेष गौरव
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी केला विशेष गौरव

प्रकाशन: 20 Feb 2023 08:13 PM
वाचन संख्या 411

संतोष साळसकर | सहसंपादक : कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कणकवली पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी भालचंद्र आचरेकर यांचा पटवर्धन चौक कणकवली येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि विशेष कौतुकही केले. १६ फेब्रुवारी रोजी श्रीधर नाईक चौक येथे पडलेले पैशाचं पाकीट ऑटो रिक्षा स्टॅन्ड क्रमांक पाच या ठिकाणी रिक्षा चालक भालचंद्र आचरेकर यांना मिळाले होते.त्यांनी मालक ॲलेक्स डिसील्व्हा यांचा शोध घेऊन यांना ते प्रामाणिकपणे परत केले होते.त्या पाकिटमध्ये महत्त्वाचे कागदपत्र पत्र व काही रक्कम होती.रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले जात होते.कणकवली वाहतूक पोलीसांनी देखील या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल त्याची भेट घेऊन पाठीवरील कौतुकाची थाप दिली.

त्यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष संतोष नाईक, रिक्षाचालक मंगेश सावंत, संजय सावंत, संतोष सदडेकर, मिलिंद सावंत,विनोद गोसावी,महेश गोसावी,गुरुनाथ मोर्ये अन्य रिक्षाचालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स