मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रिमा राजेंद्र मुंबरकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर.
महिला दिनानिमित्त ८ मार्च ला मुंबई येथे गौरविण्यात येणार आहे.
संतोष साळसकर | सहसंपादक : मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व पंचशील महिला मंडळाच्या विद्यमान सचिव रिमा राजेंद्र मुंबरकर यांनी आपल्या सरपंच पदाच्या पाच वर्षांच्या कालावधीत मिठमुंबरी गावाच्या विकासात उल्लेखनिय काम करून मिठमुबरी ग्रामपंचायत क्षेत्रात शासनाच्या विविध योजना राबवून त्या यशस्वी केल्या. तसेच महिला वर्गासाठी विविध उपक्रम राबविले याबद्दल सानेगुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ, मुंबई या संस्थेच्या वतीने त्यांना यावर्षीचा “आदर्श सरपंच” पुरस्काराने मुंबई येथे दिनांक ८,मार्च ,२०२३ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गौरविण्यात येणार आहे. दरवर्षी ही आदर्श सरपंच निवड प्रक्रिया, मुंबई येथील गेली तीस वर्षे पंचायत राज क्षेत्रात प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या डॉ.पी.व्ही. मंडलिक ट्रस्टच्या वतीने करण्यात येते. रिमा मुंबरकर यांनी केलेल्या कामाची माहिती मंडलिक ट्रस्टच्या वतीने साने गुरुजी आरोग्य मंडळाला देण्यात आली होती. डॉ.पी.व्ही.मंडलिक ट्रस्ट वसाने गुरुजी आरोग्य मंडळ या संस्थांनी त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचांमधून रिमा मुंबरकर यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल घेऊन ही निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)