ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नाहीतर सभेसाठी बैलगाड्या बोलवाव्या लागतात : युवा नेते संदेश पारकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नाहीतर सभेसाठी बैलगाड्या बोलवाव्या लागतात : युवा नेते संदेश पारकर.

प्रकाशन: 13 Feb 2023 06:34 PM
वाचन संख्या 137

विश्वकर्मा मित्रमंडळाच्या आयोजनाची आ.वैभव नाईक यांनी केली प्रशंसा ; कणकवलीतील राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा.

कणकवलीच्या चंद्रकांत सावंत यांचा बैलगाडा ठरला अव्वल तर कुंदे येथील राजू बागवेंचा बैलगाडा द्वितीय व पावशी-कुडाळच्या चंद्रकांत वाटवेंचा बैलगाडा तृतीय स्थानी.

उत्कृष्ट बैलगाडीसाठी होडावडे वेंगुर्ल्याच्या प्रथमेश होडावडेकर यांचा तर उत्कृष्ट चालक म्हणून हळवलच्या संतोष ठाकुर यांचा गौरव..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या निमेवाडी- सुतारवाडी येथे विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा काल संपन्न झाली. आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, जिल्हा बॅन्क माजी अध्यक्ष सतीश सावंत व अन्य मान्यवर तसेच नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या स्पर्धेचे युवानेते संदेश पारकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी विश्वकर्मा मित्रमंडळाची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे असे सांगताना आ.वैभव नाईक यांनी नगरसेवक सुशांत नाईक यांनीही पाठपुरावा करून सहकार्य केले असे प्रतिपादन केले. आ.वैभव नाईक पुढे म्हणाले की शेतकरी आपल्या गायी, बैलांना मनापासून जपतो. त्यांच्यावर त्यांचा मोठा जीव असतो. ही जनावरेही शेतकऱ्यांवर फार प्रेम करतात. शेतकऱ्यांनी मनापासून जपलेली संपत्ती अशा स्पर्धांमधून मैदानात उतरवतो. त्यावेळी मनापासून त्यांची काळजीही घेतो. ग्रामीण भागात असे दिसणारे चित्र आज नगरपंचायत क्षेत्रातही प्रथमच या स्पर्धेमधून सर्वांनाच प्रदर्शित झाले.

या अनोख्या स्पर्धेत २९ बैलगाडे सहभागी झाले होते. यावेळी विश्वकर्मा मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मेस्त्री,शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक,नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, हरकुळ बु. सरपंच बंडू ठाकुर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, महिला उपशहरप्रमुख दिव्या साळगांवकर,आबा दुखंडे, सदानंद राणे,मंगेश राणे,अंबाजी राणे, जयेश धुमाळे, महेश देसाई आदींसह नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे, आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, मंडळाचे चंद्रकांत मेस्त्री, कल्पेश मेस्त्री, दत्तू मेस्त्री, प्रकाश मेस्त्री,. बबन पांचाळ, सुभाष मेस्त्री, अरुण मेस्त्री, विष्णू मेस्त्री, दशरथ मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री ,नितीन पांचाळ ,अक्षय मेस्त्री, नीलकंठ मेस्त्री,संतोष राणे,महेश राणे,अमित मयेकर,प्रशांत साटम,दशरथ देसाई उपस्थित होते.

या स्पर्धेत ४०० मीटर अंतर बैलगाड्यांना पार करायचे होते. यात कणकवलीच्या चंद्रकांत सावंत यांचा प्रथम क्रमांक (वेळ ४८.१९ सेकंद), कुंदे येथील राजू बागवे (४९.७२ सेकंद) यांचा द्वितीय क्रमांक तर पावशी कुडाळ येथील चंद्रकांत वाटवे (५०.९१ सेकंद) यांचा तृतीय क्रमांक आला. पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट बैलगाडी म्हणून होडावडे – वेंगुर्ल्याच्या प्रथमेश होडावडेकर यांना तर उत्कृष्ट चालक म्हणून हळवलच्या संतोष ठाकुर यांना गौरविण्यात आले. विजेत्या चंद्रकांत सावंत यांच्या बैलजोडीला प्रेक्षकांमधून सुमारे १० हजाराची बक्षिसे देण्यात आली.

यावेळी युवानेते संदेश पारकर म्हणाले की या स्पर्धेची माहिती केवळ मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धेसाठी गाड्या आल्या…. नाहीतर सभेसाठी वगैरे मात्र गाड्या बोलवाव्या लागतात असे सांगत स्पर्धा आयोजनाबद्दल विश्वकर्मा मित्रमंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.

नगरसेवक व युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक म्हणाले की स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविल्यानंतर स्पर्धेची रितसर परवानगी घेण्यात काही दिवस गेले. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत होतो.सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या स्पर्धा संपन्न झाली. याठिकाणी निवडणुकीचा नाही तर बैलगाडी स्पर्धेचा धुरळा उडाला आहे. सतीश सावंत यांनीही स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मंडळाचे कौतुक केले. बक्षीस समारंभाला नगरसेवक सुशांत नाईक, महेश देसाई, जयू धुमाळे, नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी तर स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रीडारसिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स