ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
लोकसभेतील भाजपाच्या खासदारांच्या तक्रारीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

लोकसभेतील भाजपाच्या खासदारांच्या तक्रारीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस.

प्रकाशन: 13 Feb 2023 12:52 PM
वाचन संख्या 74

भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी दिली होती तक्रार.

ब्युरो न्यूज | दिल्ली : काॅन्ग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभेतील भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस पाठविण्यात आली आहे.

अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत टीका केली होती. या प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवांनिमी राहुल गांधींना ईमेलद्वारा ही नोटीस दिली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना १५ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण तथा उत्तर अपेक्षीत असल्याचे नोटशीत नमूद केले आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा आरोप भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स