ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सिंधुदुर्गातील ६ खेळाडुंचा ३२ व्या राज्यस्तरीय तायक्वाॅन्दो स्पर्धेत सहभाग  ; वर्धा जिल्ह्यातील पुलगांव येथे सुरु आहे स्पर्धा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्गातील ६ खेळाडुंचा ३२ व्या राज्यस्तरीय तायक्वाॅन्दो स्पर्धेत सहभाग ; वर्धा जिल्ह्यातील पुलगांव येथे सुरु आहे स्पर्धा.

प्रकाशन: 13 Feb 2023 11:47 AM
वाचन संख्या 79

सहभागी खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष संदेश पारकर व इतर पदाधिकार्यांनी दिल्या शुभेच्छा.

कणकवली | प्रतिनिधी : वर्धा येथील पुलगांव येथे १२ फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणार्या ३२ व्या राज्यस्तरीय तायक्वाॅन्दो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ खेळाडू सहभागी झाले आहेत. तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यताप्राप्त तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगांव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे कालपासून सुरू झाल्या असून त्या उद्या १४ फेब्रुवारी पर्यंत असणार आहेत.

या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ खेळाडू रवाना झाले आहेत मुलांमध्ये-कु प्रणय कुडाळकर कु. तन्वीर तांबे कु. गणराज शिरवळकर मुलींमध्ये – कु. राजलक्ष्मी कांबळे कु. सोनिया चोडनेकर कु. प्रजोती जाधव यांचा समावेश आहे. खेळाडूंसोबत टीम कोच अविराज खांडेकर व टीम मॅनेजर मानसी मुरकर आहेत.

सहभागी खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्ष सौ. राजश्री धुमाळे,कोषाध्यक्ष सुधीर राणे,विनायक सापळे, अमित जोशी,एकनाथ धनवटे,जयश्री कसालकर,नितीन तावडे आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स