मालवण म्हणजे सामाजिक जाणिवेचे दुसरे पुणे : डाॅ. रोहिणी पटवर्धन.
व्याख्यानांची केवळ ‘श्रृती नको कृती हवी ‘ या तत्वावर चालणे ही आजची गरज असल्याचे दिला जीवनमंत्र.
मालवणात ‘सेकंड इनिंग’ चे उद्घाटन संपन्न.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात बॅ. नाथ पै सेवांगण आणि ऐलमा पैलमा अक्षरदेवा साहित्य समूहाद्वारे आयोजीत ‘सेकंड इनिंग’ कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी १०:३० वाजता डाॅ. रोहिणी पटवर्धन यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर आणि ऐलमा पैलमा अक्षरदेवा साहित्य समूहाच्या वैशाली पंडित उपस्थित होत्या.
यावेळी ‘रुजवण’ म्हणजे छोट्या अंकुरीत रोपांना पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ॲड.देवदत्त परुळेकर यांनी प्रास्ताविक भाषण व संबोधन केले. त्यानंतर डाॅ. रोहिणी पटवर्धन व त्यांच्या सहकारी प्रमोदिनी वडके कवळे, मिनाक्षी डोंगरे व काळे यांचे लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी स्वागत केले.
ऐलमा पैलमा समूहाच्या अर्चना कोदे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तर वैशाली पंडित यांनी डाॅ. रोहिणी पटवर्धन यांची उपस्थित सर्वांना ओळख करुन दिली.
यानंतर डाॅ. रोहिणी पटवर्धन यांनी मालशण शहराची सामाजिक जाणिव ही पुणे शहराच्या मूळ जाणिवेशी मिळती-जुळती असल्याचे प्रतिपादन केले. एम.आय.टी.पुणे महाविद्यालयाच्या प्राचार्य असणार्या डाॅ. रोहिणी पटवर्धन यांनी ‘जेरेंटिलाॅजी’ तथा वृद्ध कल्याण शास्त्र या विषयावर मार्गदर्शक आहेत.
यावेळी सुप्रसिद्ध व्यावसायिक रुज़ारिओ पिंटो, डाॅ. मेधा फणसळकर, साहित्यिक अनुराधा दिक्षित, प्रा. ज्योती तोरसकर, प्रा. सुमेधा नाईक, साहित्यिक व पत्रकार संपदा प्रभू देसाई, रोझरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका फिलोमीना पंडित, मंदाकिनी गोडसे, ॲड. श्रीधर काळे, युवतीसेनेच्या हडी उपशाखाप्रुख प्रज्ञा कदम, व्यावसायिक पंकज पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह दीपक भोगटे ,अनेक मान्यवर, साहित्यिक व सर्व क्षेत्रातील अनेक नागरीक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)