ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगणात उलगडणार समृद्ध ज्येष्ठ नागरिकत्वाची संकल्पना.

उद्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगणात उलगडणार समृद्ध ज्येष्ठ नागरिकत्वाची संकल्पना.

प्रकाशन: 11 Feb 2023 01:37 PM
वाचन संख्या 158

वैशाली पंडित | उपसंपादक : सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि समस्या दोन्ही प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहेत.प्रत्येक कालखंडात समाजाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले त्या त्या वेळी समाजातील विचारवंतांनी समाजप्रबोधनाचे कार्य केल्याची इतिहास साक्ष आहे.

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातही ज्येष्ठ नागरिक या विषयावर अनेक विचारवंत आपापल्या परीने समाजाला जाणीवपूर्वक जागृत करताना दिसतात. त्यातल्याच एक तळमळीच्या कार्यकर्त्या आहेत डाॅ.रोहिणी पटवर्धन.पुणे, जेराँटाॕलाॕजी म्हणजेच वृद्ध कल्याणशास्त्र या विषयात पी एच डी केली आहे. वृद्धापकाळ वृद्धांसाठी आनंदी आणि सुखकर होणे जेवढे महत्वाचे तेवढेच वृद्धांची काळजी घेणा-यांसाठीही हे काम लादलेले ओझे वाटू नये हे ही महत्वाचे आहे.यासाठी कोणकोणती माहिती आणि प्रशिक्षण असायला हवे याची प्राथमिक माहिती आपल्या अडीच तासांच्या व्याख्यानाद्वारे डाॅ. रोहिणी पटवर्धन देतात.

उद्या रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ असे मालवण येथे बॕ.नाथ पै सेवांगण येथे डाॅ. पटवर्धन यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. वृद्धांबद्दल आस्था असणा-या सगळ्या वयोगटातील लोकांसाठी हा कार्यक्रम मौल्यवान आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स