ऑस्ट्रेलियन संघाचा अक्षरशः ख़ुर्दा ; संपूर्ण कसोटीत भारतीय संघाचे वर्चस्व.
बाॅर्डर-गावस्कर चषकातील नागपूर पहिल्या कसोटीत भारताचा १ डाव व १३२ धावांनी दणदणीत विजय.
अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा आणि कर्णधार रोहीत शर्मा ठरले ऑस्ट्रेलियन संघाचा कर्दनकाळ.
मालवण | सुयोग पंडित : नागपूर येथे सुरु असलेल्या ‘बाॅर्डर-गावस्कर चषक २०२३’ कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा अक्षरशः ख़ुर्दा करत दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन क्रीडा प्रसार माध्यमांनी ज्या नागपूरच्या खेळपट्टीवर आंतरराष्ट्रीय मिडियात आगपाखड केली होती त्याच खेळपट्टीवर भारताचा सलामीवीर कर्णधार रोहीत शर्माचे शतक, अष्टपैलू रवींद्र जाडेजा व अक्षर पटेलची अर्धशतके आणि रविचंद्रन अश्विनची संयमी खेळी व कमाल म्हणजे गोलंदाज मोहम्मद शामीच्या टोलेबाजीने त्याच खेळपट्टीवर पहिल्या डावात जवळपास पावणे दोन दिवस तग धरुन भारतातची धावसंख्या ४०० पर्यंत पोहोचवली.
ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात १७७ व दुसर्या डावात केवळ ९१ धावाच जमवू शकला.
आज तिसर्या दिवशी रविचंद्रन अश्विनच्या फिरकीने ५ बळी घेतले तर त्याला शामी व जाडेजाची उत्तम साथ लाभली.
रवींद्र जाडेजानेही पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ बळी मिळवले होते. आता भारताची बाॅर्डर-गावस्कर चषकात १-० अशी आघाडी घेतली आहे व पुढील सामना १७ फेब्रुवारीला अरुण जेटली तथा फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवला जाणार आहे.
आजच्या सामन्यात मोहम्मद शामीने फलंदाज म्हणून कामगिरी करताना कोहली, द्रविड, पुजारा व लक्ष्मण यांना कसोटीतल्या षटकारांच्या बाबतीत मागे टाकले हा ही एक अनोखा विक्रम आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)