ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने श्री तुषार नाईक मोचेमाडकर यांचा सत्कार.

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने श्री तुषार नाईक मोचेमाडकर यांचा सत्कार.

प्रकाशन: 10 Feb 2023 08:55 PM
वाचन संख्या 53

राज्याच्या लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी झाली आहे तुषार नाईक मोचेमाडकर यांची निवड.

सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड यांचे संचालक आहेत तुषार नाईक मोचेमाडकर.

विवेक परब | ब्युरो चीफ : महाराष्ट्र राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी, प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाडचे संचालक तुषार सोनू नाईक यांची निवड या समितीच्या सदस्यपदी करण्यात आली याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात व लोककलांची माहिती पुढील पिढीला व्हावी आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन द्यावे या हेतूने त्यांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी, प्रयोगासाठी अनुदान देण्याच्या योजनेस शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली होती तसेच शासन निर्णयान्वये कलापथकांना भांडवली खर्चासाठी तसेच प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी या कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे व त्यांची नियमानुसार पात्रता तपासून निवड करण्यासाठी निवड समिती गठीत करण्याची तरतूद होती त्या अनुषंगाने राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी तसेच प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे . सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीच्या अध्यक्षपदी असून सदस्यपदी दशावतार कला प्रकार साठी तुषार नाईक मोचेमाडकर व देवेंद्र नाईक यांची निवड करण्यात आली आहे .

वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथील निवासस्थानी तुषार नाईक यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपू परब, बाबल नाईक, मोचेमाड माजी सरपंच रसिका गावडे, मोचेमाड बुथ प्रमुख उदय गावडे , ग्रामपंचायत सदस्य नारायण गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

ही समिती शासन निर्णय पुढील ३ वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत जे अगोदर घडेल तो पर्यंत कार्यरत राहणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स