ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बांदिवडेत स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीराला सुखद प्रतिसाद ; नूतन ग्रामपंचायत कार्यकरिणीच्या लोकसेवा उपक्रमांचा यशस्वी श्रीगणेशा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदिवडेत स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीराला सुखद प्रतिसाद ; नूतन ग्रामपंचायत कार्यकरिणीच्या लोकसेवा उपक्रमांचा यशस्वी श्रीगणेशा.

प्रकाशन: 07 Feb 2023 06:36 PM
वाचन संख्या 291

युवा परिवर्तन केंद्र कुडाळच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीर संपन्न.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे ग्रामपंचायत व युवा परिवर्तन केंद्र, कुडाळचा संयुक्त उपक्रम असणारे व्यवसाय तथा स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर काल ६ फेब्रुवारीला बांदिवडे केंद्र शाळा क्र.१ येथे संपन्न झाले. या शिबिरात युवा वर्ग आणि बचत समूहातील महिलांची उपस्थिती होती.

बांदिवडे ग्रामपंचायतच्या नवीन ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीने आखलेला हा पहिलाच ग्रामव्यापक उपक्रम होता. सरपंच आशू मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी ग्रामपंचायत सदस्य नारायण परब आणि इतर सहकारी कार्यकारिणीने युवा परिवर्तन केंद्र कुडाळच्या माध्यमातून हा उपक्रम निश्चित केला होता.

या उपक्रमाबद्दल माध्यमांना माहिती देताना सरपंच आशू मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी व ग्रामपंचायत सदस्य नारायण परब यांनी ग्रामपंचायतच्या वतीने स्पष्ट केले की या शिबिराचा साधारण ३० ते ३५ प्रशिक्षणार्थी लाभ घेऊन उपस्थित राहतील असा अंदाज असताना तब्बल ७० जणांनी तिथे उपस्थिती दर्शवली. यामुळे गावासाठी आणखीन दुप्पट ताकदीने काम करायचे बळ आपल्याला लाभले आहे. युवा परिवर्तन कुडाळच्या मार्गदर्शक टीमचेही त्यांनी आभार मानले. गावातील जनतेचा आपल्या नवीन ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीवरचा विश्वास किती मजबूत आहे ते या शिबिरातून समजले असल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला. गावातील आबालवृद्ध, युवक, महिला, होतकरू, आणि पिडितांसाठी आपण आता अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपस्थित ग्रामपंचायत कार्यकारिणीने केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स