ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मडुरे हायस्कूलच्या 'वर्ग मैत्रीचा' मळा फुलला तब्बल  ३३ वर्षांनी…!

मडुरे हायस्कूलच्या 'वर्ग मैत्रीचा' मळा फुलला तब्बल ३३ वर्षांनी…!

प्रकाशन: 07 Feb 2023 08:33 PM
वाचन संख्या 152

मडुरे हायस्कूलच्या १९८८-९० बॅचचे ‘गेट टू गेदर ‘बांदा संपन्न.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९८८-८९  बॅचचे गेट टुगेदर नुकतेच बांदा येथे संपन्न झाले. ३३ वर्षांनंतर मित्रमैत्रिणींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनातील दैनंदिन कामकाज बाजूला सारुन मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. तब्बल ३३ वर्षांनंतर शालेय मित्रमैत्रिणी गेट टुगेदर निमित्त एकत्र आल्याने सर्वांच्याच चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपापली सुखदुःखे शेअर करताना दिसत होते. नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक विचारपूस करताना दिसत होते. शिक्षकांची माहिती, शाळेच्या भौतिक समस्या, आवश्यक बदल यासंबंधीही सर्वांनी चर्चा केली. यानिमित्ताने स्नेहभोजन, कराओके गायन, विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. अगदी प्राथमिक शालेय स्तरापासूनच्या अनेक आठवणी, शाळेतील किस्से, दंगामस्ती यांना यानिमित्ताने उजाळा मिळाला. नोकरी, व्यवसायात अनेकांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करण्यात आले.

यावेळी भगवान कासकर, अर्जुन परब, विठ्ठल धुरी, जयेश माधव, राजन धुरी, राजेंद्र भाईप, विद्याधर नाईक, संतोष चिंदरकर, गोपाळ सातार्डेकर, अजित शेर्लकर, सुधीर ठाकूर, उल्हास परब, गुंडू कुणकेरकर, राजाराम शेर्लेकर, तातो पावसकर, उमेश पंडित, शिवराम जाधव, महेश तळगांवकर, तुकाराम पंडित, गोविंद ठाकूर, नंदा पांचाळ, भारती शेटकर, रेषा भगत, वनिता भाईप, सुजाता आरोसकर, कु़ंदा भगत, ज्योती सावंत व कल्पना गावडे असे मित्र मैत्रीण या वर्गमैत्रीच्या मळ्यात सहभागी झाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स