ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
म.वि.आ. सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या 'जल जीवन मिशन' च्या ४२९ करोडच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश : जिल्ह्यातील  ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश.

म.वि.आ. सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या 'जल जीवन मिशन' च्या ४२९ करोडच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश : जिल्ह्यातील  ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश.

प्रकाशन: 07 Feb 2023 02:12 PM
वाचन संख्या 69

आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी पूर्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केला होता पाठपुरावा.

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र  राज्याचे पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक घरात नळ जोडणी करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांचा  सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केला. सुरुवातीला २०७ कोटी ५४ लाख व त्यानंतर त्यात वाढ करून  ४२९ कोटी ६८ लाखाचा आराखडा तयार करून १४ एप्रिल २०२१ रोजी तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी  पाठविण्यात आला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने  तात्काळ जलजीवन मिशन आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्या नंतर काही त्रुटींबाबत आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार त्या मार्गी लावण्यात आल्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या जलजीवन मिशनच्या  ४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत सर्वच्या सर्व ६६५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व  ४३१ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या सर्व गांवातील पिण्याच्या पाण्याची समस्या आता मार्गी लागणार असून सरपंच व ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजना व्यवस्थित राबवुन घ्यावी अशा सूचना दिल्या गेल्या आहेत असे सूत्रांकडून समजते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स