खारेपाटण विभागात भाजपाला मोठा धक्का..!
खारेपाटण विभागाचे माजी जि.प.सदस्य कै. बाळा वळंजु यांचे विश्वासू सहकारी राहिलेले एकनाथ कोकाटे अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल…!
खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगांवचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगांव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कनेडी शाखेत माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
एकनाथ कोकाटे यांच्या समवेत शैलेश कोकाटे, अंकिता कोकाटे, शर्वरी कोकाटे, शोभा पाष्टे, शुमम् पाष्टे, प्रमोद केसरकर , संगीता गांगण यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे समजते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,अतुल रावराणे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख सावंत आदींसह वारगांव मधील ज्येष्ठ शिवसैनिक मधुकर वळंजु, माजी सरपंच बापू नर,बाळा राऊत,अंजली मेस्त्री, अरुण मेस्त्री, संतोष सोरप,जयेश नागवेकर, नर आदीसह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.
खारेपाटण विभागाचे माजी जि.प.सदस्य स्वर्गीय बाळा वळंजु यांचे विश्वासू सहकारी राहिलेले एकनाथ कोकाटे हे खारेपाटण विभागातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते. सहकाऱ्यांसमवेत त्यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)