ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आज सॉफ्टबॉल ज्युनियर सिंधुदुर्ग जिल्हा संघांची निवड चाचणी.

आज सॉफ्टबॉल ज्युनियर सिंधुदुर्ग जिल्हा संघांची निवड चाचणी.

प्रकाशन: 05 Feb 2023 08:08 AM
वाचन संख्या 88

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या वतीने ज्युनिअर सॉफ्टबॉल मुले व मुली संघांची निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी सकाळी १० वा.सरस्वती विद्यामंदिर,कुडासे ता.दोडामार्ग येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्मतारीख १/१/२००५ नंतरची असावी. खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा आणावा व आवश्यक साहित्यासह उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतून निवडलेला संघ सोलापुरातल्या अक्कलकोट येथे ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल.
अधिक माहिती साठी जिल्हा सचिव अजय शिंदे मालवण (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या निवड चाचणी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे सुरेंद्र सकपाळ व जिल्हा सचिव अजय शिंदे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स