मुणगे गोठण येथे २ फेब्रुवारीला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील ‘श्री गोपाळकृष्ण गोठण गवळदेव मंडळ, लब्देवाडी, आडवळवाडी, आपईवाडी (अलीकडील मंडळी)’, यांच्या संयुक्त विद्यमाने त्रैवार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा २ फेब्रुवारीला आयोजित केली आहे.
या दिवशी सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.०० वा. आरती व तीर्थ प्रसाद – महाप्रसाद, दुपारी ३.०० वा.हळदीकुंकू समारंभ,
रात्रौ ७.३० वा.स्थानिक भजने, रात्रौ १०.०० वाजता ‘जयघोष हरिमानाचा’ हा कार्यक्रम होईल. यावेळी जयंती देवी प्रासादिक दिंडी भजन, पळसंब, विठ्ठल रखुमाई प्रासादिक दिंडी भजन आचरा देऊळवाडी , आई भगवती कलादिंडी, तोरसोळे ही मंडळे सहभागी होणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याला जास्तीतजास्त उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)