ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तन्मय आणि आयुष राजापुरे बंधुंची सि.बी.एस.सी.राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पदकांची कमाई ; गुजरातमधील राजकोट येथे संपन्न झाली स्पर्धा.

तन्मय आणि आयुष राजापुरे बंधुंची सि.बी.एस.सी.राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पदकांची कमाई ; गुजरातमधील राजकोट येथे संपन्न झाली स्पर्धा.

प्रकाशन: 31 Jan 2023 02:44 PM
वाचन संख्या 326

मूळ मालवणचे आहेत राजापुरे बंधू.

मालवण | सुयोग पंडित : मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे असलेल्या तन्मय संतोष राजापुरे आणि आयुष संतोष राजापुरे यांनी सि.बी. एस.सी.राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.

२१ ते २५ जानेवारी दरम्यान गुजरातच्या राजकोट येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत तन्मय राजापुरे याने १४ वर्षांखालील गटात, ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक व ५० बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले. २०० मीटर पोहणे प्रकारात त्याला राष्ट्रीय स्तरावर ४ थे स्थान प्राप्त झाले.

आयुष राजापुरे याने ११ वर्षांखालील गटात, ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली तर २०० मीटर पोहण्यात त्यानेही राष्ट्रीय स्तरावर ४थे स्थान प्राप्त केले.

हे दोघेही कै.पि.बी.ज़ोग इंग्लिश मिडियम स्कूल, मयूर वसाहत,पुणे येथे शिकत आहेत. वयाच्या प्रत्येकी ७ व्या वर्षांपासून दोघांनीही जलतरण या प्रकाराला व्यावसायिक मार्गदर्शनाखाली सुरवात केली.
दोन्ही राजापुरे बंधुंना ‘चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लब, पुणे’ चे प्रशिक्षक विनय मराठे यांचे प्रशिक्षण लाभत आहे. २ फेब्रुवारीपासून पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात सुरु होणार्या ५० मीटर बॅकस्ट्रोक व बटरफ्लाय तसेच २०० मीटर पोहणे स्पर्धा प्रकारासाठी
तन्मय राजापुरे राज्य जलतरण स्पर्धेत पात्र ठरला आहे.

तन्मय आणि आयुषचे वडिल श्री संतोष राजापुरे हे मूळ मालवण शहरातील. मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (गव्हर्नमेंट पाॅलिटेक्निक GPM) त्यांनी डिप्लोमा शिक्षण घेतले आहे. त्यांनाही ॲथलेटीक्स व जिम्नॅशिअम प्रकारात रुची होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालक व युवकांनी जलतरण तसेच ओपन ओशन वाॅटर स्विमींग व इतर ॲथलेटीक्स मध्ये सहभाग घ्यावा आणि यश संपादन करावे अशा सदिच्छाही त्यांनी आपली सिंधुनगरी चॅनेलशी बोलताना दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स