ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड अर्बन बँकेवर पुन्हा शिवम पॅनेलचे वर्चस्व ; सहकार समृध्दी पॅनलचा सपशेल पराभव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड अर्बन बँकेवर पुन्हा शिवम पॅनेलचे वर्चस्व ; सहकार समृध्दी पॅनलचा सपशेल पराभव.

प्रकाशन: 31 Jan 2023 02:01 PM
वाचन संख्या 82

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील ‘देवगड अर्बन को ऑपरेटीव्ह बँक’ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शिवम सहकार पॅनेलने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले असून बाराही जागा जिंकत शिवसेना व काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनेलला सपशेल मात दिली आहे.

देवगड अर्बन बँकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शिवम पॅनल व शिवसेना काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनल या दोन पॅनलमध्ये झाली.ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली.या निवडणुकिमध्ये एकूण १३ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली होती तर उर्वरीत १२ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी अर्बन बँक कार्यालयात मतमोजणी पार पडली. यामध्ये बाराही जागांवर शिवम पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
शिवम सहकार पॅनलमधून विजयी झालेले उमेदवार
सर्वसाधारण गटातून सदाश{व ओगले(१९४५), प्रकाश राणे (१८०८), अभय बापट(१९४३), ॲड.अभिषेक गोगटे(१९३६), डॉ.अमोल तेली(१८४३), दिनेश नंदकुमार घाटे(२०७२), समीर पेडणेकर(१९३१), महिला राखीव गटातून वैशाली तोडणकर(१९७७), ललिता शेडगे(१९३८) इतर मागास प्रवर्ग गटातून महादेव ऊर्फ बाबा आचरेकर(२१७५), अनु.जाती/जमाती गटातून सुरेंद्र चव्हाण(२१४३), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून संजय बांदेकर(२१०९) हे उमेदवार विजयी झाले.तर या पॅनलचे सर्वसाधारण गटातील देवगड तालुक्याबाहेरील उमेदवार अनिल ऊर्फ बंड्या सावंत हे बिनविरोध निवडून आले.

सहकार समृध्दी पॅनलमधील उमेदवारांना मिळालेली सर्वसाधारण गटातून अब्दुल रशिद अली खान(९९७), उल्हास मणचेकर(११५४), संतोष तारी(११३१), किरण टेंबुलकर(१०२७),रघुवीर वायंगणकर(९५७), महिला राखीव गटातून विशाखा मांजरेकर(१२०२), सुगंधा साटम(९७६), इतर मागास प्रवर्ग गटातून मनोज पारकर(१००३), अनु.जाती/जमाती गटातून सुरेश देवगडकर(१०४४), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून धनंजय जोशी(१०७२) मते मिळाली.
निकाल जाहीर झाल्यानंतर शिवम पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फाटाके वाजवून जल्लोष साजरा केला शिवम पॅनलचे सर्वेसेवा नंदकुमार घाटे, माजी आमदार ॲड.अजित गोगटे, जिल्हा बँक संचालक ॲड.प्रकाश बोडस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, माजी चेअरमन भाई आचरेकर यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, मुकूंद फाटक, महिला तालुकाध्यक्षा उष:कला केळूसकर, माजी जि.प.सदस्या सावी लोके, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, प्रकाश गोगटे, शरद शिंदे, मंगेश लोके, निलेश पेडणेकर, नागेश आचरेकर आदी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी माणिक सांगळे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निबंधक देवगड अनिल राहीज व उमिर्ला यादव यांनी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स