ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांना पत्नीशोक ; सौ.रसिका राजेंद्र प्रभूदेसाई कालवश.

माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांना पत्नीशोक ; सौ.रसिका राजेंद्र प्रभूदेसाई कालवश.

प्रकाशन: 30 Jan 2023 12:36 PM
वाचन संख्या 144

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या
वडाचापाट येथील सौ. रसिका राजेंद्र प्रभूदेसाई ( ५४ वर्ष) यांचे काल रविवारी २९ जानेवारीला पहाटे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दीर, जाऊ, पुतणे, भाऊ, बहिणी, भावजय, भाचे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मालवणचे माजी सभापती भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते, खरेदी विक्री संघ मालवणचे संचालक आणि वडाचापाट विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रभूदेसाई यांच्या त्या पत्नी होत. सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी रवींद्र प्रभूदेसाई यांच्या वहिनी तर ग्रामसेवक सुनील देसाई, युवा कार्यकर्ते दयानंद प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभूदेसाई, अमित व अरुण प्रभूदेसाई यांच्या त्या काकी तर सिव्हिल इंजिनियर राकेश प्रभूदेसाई यांच्या आई आणि वडाचापाट सरपंच सौ सोनिया दयानंद प्रभूदेसाई यांच्या सासू होत. रविवारी वडाचापाट स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सौ.रसिका राजेंद्र प्रभूदेसाई यांच्या निधनाने जिल्ह्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स