आ. वैभव नाईक यांनी कोकण शिक्षक मतदार संघाचे म.वि.आ. उमेदवार श्री बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ दिली मतदान केंद्राला भेट.
मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवलीतील ‘कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२३’ च्या मतदान केंद्राला भेट दिली.
आज सुरु झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ आज कणकवली येथील मतदान केंद्रावर आमदार वैभवजी नाईक यांनी ही भेट दिली.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, बळीराम पाटील, सतीश म्हात्रे, कमलेश गोसावी, रुपेश आमडोसकर, तेजस राणे असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)