ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा गणेशनगर येथे माघी गणेश जयंती उत्साहात ; विशेष गणेशयाग कार्यक्रमाचे झाले आयोजन.

बांदा गणेशनगर येथे माघी गणेश जयंती उत्साहात ; विशेष गणेशयाग कार्यक्रमाचे झाले आयोजन.

प्रकाशन: 28 Jan 2023 02:20 PM
वाचन संख्या 138

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा-वाफोली मार्गावर गणेश नगर येथे असलेल्या श्री गणेश मंदिरात  माघी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यंदा सर्वभक्तगणांना सुख, समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे यासाठी मंगळवारी ‘गणेशयाग’ कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते.या सोहऴ्यात १००८ मोदकांच्या आहुती देण्यात आल्या. अनेक दांपत्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
बुधवारी माघी गणेश जयंती सोहळा पहाटे काकड आरतीने आरंभ झाला. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. काकडआरती नंतर अभिषेक व पूजा, श्री सत्यविनायक महापूजा,ठिक दुपारी १२ वा. गणेश जन्म सोहळा  व त्यानंतर  महाप्रसाद कार्यक्रम झाला.
सायंकाळी विविध भजनांचे कार्यक्रम तर रात्रौ श्री अष्टविनायक दशावतारी नाट्यमंडळ, निरवडे, ता. सावंतवाडी यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘माहेरवाशिणी आई भवानी’ आय़ोजित करण्यात आला होत. उत्सवानिमित्त मंदिराचे आकर्षक रंगकाम ,फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी हजारोंच्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री गणेश मंदिर सेवा समिती, बांदा च्या वतीने  कार्यक्रमाचे उत्तम नियोजन  करण्यात आले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 304

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स