ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मडुरा-बाबरवाडी येथील काजू बागेला भीषण आग ; ४० कलमे जळली.

मडुरा-बाबरवाडी येथील काजू बागेला भीषण आग ; ४० कलमे जळली.

प्रकाशन: 28 Jan 2023 02:00 PM
वाचन संख्या 51

शरद रेडकर यांची ६ वर्षांची मेहनत जळून ख़ाक ; अनावर झाले अश्रू…

बांदा | राकेश परब : मडुरा-बाबरवाडी येथील काजू बागायतदार शरद रेडकर यांच्या बागेला दुपारच्या सुमारास आग लागून ४० काजू कलमे जळाली. यात बागायतदार रेडकर यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बाबरवाडी येथील काजू बागायतीत दुपारच्या सुमारास अचानक धूर दिसू लागला. जवळपास काम करत असलेले नितीन धुरी, अभिमन्यू धुरी यांनी तात्काळ बागेजवळ धाव घेतली व आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. काही प्रमाणात गवत असल्यामुळे आग विझविताना कसरत करावी लागली. आगीची खबर समजतात मालक शरद रेडकर, शामल रेडकर, गुरु रेडकर, सखाराम रेडकर यांनीही धाव घेतली. वेळेत आग विझविल्याने लागूनच असलेल्या सुमारे ५० एकरवरील बागायती वाचल्या. सहा वर्षांची मेहनत आज लागलेल्या आगीत खाक झाली असे सांगत शेतकऱ्याने अश्रू अनावर होत डोळ्यात पाणी आणले. यावेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागून आपले नुकसान झाल्याचे बागायतदार रेडकर यांनी सांगितले. मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनीही भेट घेत वीज अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, बांदा सहाय्यक कनिष्ठ अभियंता अनिल यादव व वायरमन सपकाळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येत पाहणी केली. तसेच भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री. यादव यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स