ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डिकवल येथे बायोकोल युनिटचा भूमिपूजन सोहळा संपन्न ; रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे वरिष्ठांचे स्पष्टीकरण.

डिकवल येथे बायोकोल युनिटचा भूमिपूजन सोहळा संपन्न ; रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे वरिष्ठांचे स्पष्टीकरण.

प्रकाशन: 28 Jan 2023 12:39 PM
वाचन संख्या 177

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या डिकवल येथे शिवस्वप्न बायोफ्युएल्स प्रायव्हेट लि. मालवण व शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि.मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील प्रस्तावित बायोकोल (m-COAL) युनिटचा भूमिपूजन सोहळा कार्तिक रावल (National Prime BDA – MCL) यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी कार्तिक रावल यांनी उपस्थितांना MCL व m -COAL संबंधी विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जोडले जाऊन आपल्या तालुक्याला सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

त्यांनी शिवस्वप्न कंपनीला शुभेच्छा देताना मालवण मधील शिवस्वप्न कंपनी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्याचे काम करत असल्याचे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाप्रसंगी श्री. रमेश पाटील (Senior BDA-MCL) यांनी MCL चे कार्य, व्हिजन, मिशन याबद्दल मार्गदर्शन केले. शिवस्वप्न कंपनीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री. सागर सांगेलकर यांनी MCL च्या माध्यमातून m-COAL युनिट चे महत्व, भविष्यातील रोजगाराच्या संधी व पुढील कालावधीतील विकासात्मक प्रकल्पांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्री. निखिल ढोकरे, श्री स्वप्नील तेजम , श्री. हरिहर मयेकर, व इतर जिल्ह्यातील एमपीओचे संचालक उपस्थित होते. यावेळी माजी जि.प.सदस्य श्री. अनिल कांदळकर, ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल चे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य, गावकर मंडळी, पंचक्रोशीतील मान्यवर, शेतकरी, महिला तसेच शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ, ग्रामोद्योजक,गावप्रतिनिधी, चॅनेल पार्टनर व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जमीनमालक श्री. श्रीकृष्ण तेली, तेली यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला गावातील लोकांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी मदत केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स