वडाचापाट येथे २९ रोजी जत्रोत्सव ; श्री शांतादुर्गा देवी सभामंडप, पाटकरवाडी बंधुमंडळ यांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री शांतादुर्गा देवी सभामंडप वडाचापाट, पाटकरवाडी बंधुमंडळ यांच्या तर्फे होणारा वार्षिक जत्रोत्सव २९ जानेवारीला संपन्न होणार आहे.
यानिमित्त रात्री ८ वा.स्वयंभू आई श्री देवी शांतादुर्गा देवीची विधिवत पूजा अर्चा पाटकरवाडी बंधू मंडळ आणि आप्तेष्ट यांच्या वतीने, रात्री ८ वा. १५ मि. ओटी भरणे आणि नवस फेडणे, रात्री ११ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ,ओसरगांव तर्फे दहीकाला (नाटक) होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)