ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
नवोदय स्पर्धा स्पर्धा परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेच्या कु. प्राप्ती लांघी हिचे यश..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नवोदय स्पर्धा स्पर्धा परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेच्या कु. प्राप्ती लांघी हिचे यश..!

प्रकाशन: 29 Sep 2021 03:02 PM
वाचन संख्या 182

खारेपाटण : प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेतील  कु. प्राप्ती प्रदीप लांघी या विद्यर्थिनीची सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय स्पर्धा परीक्षेत नुकतीच निवड झाली आहे. प्राप्तीने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

खारेपाटण केंद्र शाळा नं. १ या शाळेची नुकतीच जिल्ह्यातून मॉडेल स्कुल म्हणून राज्यात निवड झाली असून कु. प्राप्ती लांघी या विद्यर्थिनीने नवोदय परिक्षेत मिळविलेल्या यशामुळे शाळेच्या बौद्धिक प्रगतीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असल्याचे समाधान खारेपाटण जि. प. केंद्रशाळा खारेपाटण नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गौरी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी कु. प्राप्ती प्रदीप लांघी या विद्यर्थिनीच्या घरी जाऊन तीचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, अर्चना तळगावकर, सहाय्यक शिक्षिका स्मिता कोरगावकर, रेखा लांघी, अलका मोरे, अमृता ब्रम्हदंडे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

खारेपाटण केंद्रशाळेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती प्रदीप लांघी हिची सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली असुन तिला सतत मार्गदर्शन करणारे तिच्या शाळेचे शिक्षक व तिचे आईवडील यांचे देखील खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात  आले आहे.
खारेपाटमधील शैक्षणिक प्रगतीचा वारसा प्राप्तीने पुढे नेला आहे अशी प्रतिक्रिया खारेपाटणवासियांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स