वेंगुर्ले भाजपाच्या वतीने बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे अभिनंदन व सत्कार.
विवेक परब | ब्यूरो चीफ : नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ’ मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम .भैरट, प्रा.डाॅ .एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला व महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना(बाळू)देसाई, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका श्रेया मयेकर तसेच संस्था प्रतीनीधी सुरेंद्र चव्हाण, प्रा . डॉ.आनंद बांदेकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)