ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपारी बाग सुपर बाजार येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न.

बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपारी बाग सुपर बाजार येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न.

प्रकाशन: 23 Jan 2023 02:43 PM
वाचन संख्या 222

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या एस.एम.हायस्कूल समोरील ‘सुपारी बाग मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघ मर्यादीत सुपरबाजार’ येथे हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.
बाॅलिवुड,मराठी,रंगमंच तसेच लोककला तज्ञ अभिनेत्री म्हणून परिचीत असलेल्या अक्षता कांबळी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आकर्षण होत्या.

हा हळदीकुंकू समारंभ आज दिनांक २३ जानेवारीला संपन्न झाला . यावेळी सुपरबाजारच्या संचालिका . कल्पना किशोर देसाई यांच्या हस्ते कांबळी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ,तसेच हळदीकुंकू वाण ही देण्यात आले .
या कार्यक्रमात कर्मचारी सानिका सावंत ,रुपाली चौकेकर,प्रतीक्षा माणगांवकर ,पूजा मोरे,प्रिया वाळवे,मयूरा चव्हाण, मिलन पाटील उपस्थित होत्या. सुपरबाजार संस्थेचे चेरमन श्री किशोर देसाई व कणकवली व्यवस्थापक श्री राजन अनंत सावंत आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते ,चेरमन श्री देसाई यांनी कांबळी यांच्या कलेची प्रशंसा केली व आपल्या सुपरबाजारच्या नित्याच्या ग्राहक म्हणून भरभरून शुभेच्छा दिल्या.

.अक्षता कांबळी यांनीही उपस्थित महिला,ग्राहक तसेच संपूर्ण सुपारी बाग सुपर बाजार मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघ मर्यादीत या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स