ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओसरगांवातील महिला भवनात जिल्हा भाजपाची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक संपन्न ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती.

ओसरगांवातील महिला भवनात जिल्हा भाजपाची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक संपन्न ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती.

प्रकाशन: 23 Jan 2023 10:33 AM
वाचन संख्या 49

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला भवन – ओसरगांव , कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली , आमदार नितेश राणे , माजी आमदार अजित गोगटे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण , लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व मनोज रावराणे , युवा मोर्चाचे भाई सावंत , प्रज्ञा मंचचे डॉ.मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते .

डाटा व्यवस्थापन विभागाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी अभियानाची माहिती दिली.तसेच अभियानाचे चार टप्पे समजावून सांगितले . तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून या विषयाकडे बघणे आवश्यक असल्याचे सांगितले .

या बैठकीला जिल्हा पदाधिकारी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य , तालुकाध्यक्ष , विविध मोर्चा – आघाडी – सेलचे पदाधिकारी व आजी / माजी लोकप्रतिनिधी, डेटा व्यवस्थापन आणि उपयोग जिल्हा समीतीचे सह – संयोजक प्रभाकर सावंत , आईटी ( IT ) चे केशव नवाथे , सोशल मीडिया चे समिर प्रभुगांवकर , जिल्हा संवादक सौ. सई चेंदवणकर उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स