ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नांदगांव उर्दू शाळेत उर्दू शिक्षक संघटनेचा मेळावा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नांदगांव उर्दू शाळेत उर्दू शिक्षक संघटनेचा मेळावा संपन्न.

प्रकाशन: 21 Jan 2023 12:12 PM
वाचन संख्या 33

संतोष साळसकर | सहसंपादक : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना सिंधुदुर्गचा वार्षिक मेळावा नांदगांव व उर्दू शाळेत उत्साहात झाला. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राज्य सचिव ताजुद्दिन परकार, उपाध्यक्ष रिजवान शेख, कोकण विभाग सचिव शाहनवाज लोरे, रायगड जिल्हाध्यक्ष अखलाक गोडमे, रत्नागिरी सचिव रियासत नाईक, राज्य संघटक सियाकत राऊत, रायगड सचिव राज अहमद, कोल्हापूर कार्याध्यक्ष शाहनूर, शौकत ऐनरकर, राज्य संघटक हाजी सुलेमान बेग व उर्दू शिक्षक उपस्थित होते.

यावेळी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील उर्दू शिक्षक रिक्त पदे तात्काळ भरणे, आंतर जिल्हा बदली झालेल्यांना कार्यमुक्त करणे, अल्पसंख्याक मुलांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देणे, जुनी पेन्शन तसेच मुस्लिम राज्यातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देऊन पुर्ण समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी काय करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी प्रयत्न तर मुस्लिम समाजाच्या विकासासाठी उर्दू शिक्षकांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स