ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'मॅन ऑफ द मुव्हमेंट..' चंद्रकांत विजय गोलतकर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'मॅन ऑफ द मुव्हमेंट..' चंद्रकांत विजय गोलतकर..!

प्रकाशन: 21 Jan 2023 11:24 AM
वाचन संख्या 207

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गांवचे माजी सरपंच आणि सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत विजय गोलतकर हे एक समाजाभिमुख राजकीय व्यक्तिमत्व. राजकारण हा समाजकारणाचाच एक तांत्रिक भाग आहे अशी ठाम धारणा असलेल्या चंद्रकांत गोलतकर यांचे संपूर्ण जीवन एक मुव्हमेंट तथा चळवळ आहे.

बालपणापासूनच पळसंब व परिसरातील सामाजिक व व्यावसायिक गोष्टींना तीक्ष्ण नजरेने अभ्यासून आणि समाजातील छोट्या मोठ्या तांत्रिक समस्यांना टिप कागदाप्रमाणे मनात शोषून घेऊन, वेळ आल्यावर त्यावर काहीतरी केले पाहिजे अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती. कालांतराने २०१७ साली आपल्या पळसंब गांवच्या सरपंचपदी ते ‘क्रियाशील’ झाले. महत्वाचे म्हणजे चंद्रकांत गोलतकर हे कधीच ‘विराजमान’ होऊन स्वस्थपणे फर्मान सोडून कामं करायच्या संस्कृतीतील नसल्यामुळे इथे ते क्रियाशील झाले म्हणणेच योग्य ठरते.

गावातील श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान व जयंती कला क्रीडा मंडळ ,पळसंब यांच्या प्रत्येक सृजनशील उपक्रमांमध्ये सदैव चैतन्याने वावरणारे चंद्रकांत विजय गोलतकर यांना सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष पद मिळाले तेंव्हा देखील त्यांनी त्याला पुरस्कार किंवा पद न समजता ती जबाबदारी समजली यावरुनच त्यांची एक अथकता लक्षात येते.

पोर्णिमा कन्सट्रक्शन व मोरया कला केंद्र असे दोन ‘निर्मितीक्षम’ प्रकल्प चालवताना त्यांच्यामार्फत नवनवीन प्रतिभा व रोजगार अशी दुहेरी संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात व सहजपणे अंमलात आणली आहे. नेहमी काहीतरी सृजनाचे कृती अस्तित्व जपलेल्या चंद्रकांत गोलतकर यांना ‘मॅन ऑफ द मुव्हमेंट’…किंवा कृतीशील,गतीशील चळवळींचा ‘माणुस’ म्हणणेच त्यांचे योग्य वर्णन ठरेल.

‘शेती,माती आणि समाजातील घट्ट टिकवून ठेवाविशी नातीगोती’या विनम्र जिव्हाळ्याचे व बहुमुखी प्रतिमेचे धनी असलेल्या श्री.चंद्रकांत विजय गोलतकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

( आपली सिंधुनगरी चॅनल समूह )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स