डोंगरपाल येथील निवृत्त सैनिक शंकर परब यांचे निधन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल – खालचीवाडी येथील शंकर गोविंद परब ( वय ९१) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते भारतीय सैनिक दलातील सेवा निवृत्त स्वातंत्र सैनिक तसेच गोवा शिपयार्ड मधील सेवानिवृत्त कर्मचारी होते.
कै.शंकर परब हे उत्कृष्ट भजनकर्मी व नाट्य कलाकार देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगे, विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलींद परब व राजेश परब यांचे वडिल होत. त्यांच्या निधनाने डोंगरपाल परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)