ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची दिव्यांग बांधवांची मागणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची दिव्यांग बांधवांची मागणी.

प्रकाशन: 18 Jan 2023 03:24 PM
वाचन संख्या 32

संतोष साळसकर | सहसंपादक : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रु. पेंशन मिळते. मात्र ही पेंशन योजना तुटपुंजी असली तरी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत आहे. मात्र ही पेन्शन दिव्यांग व्यक्तींना कधी कधी दोन – तीन महिने मिळत नाही. त्यामुळे त्या दिव्यांग व्यक्तीची आर्थिक घडी बसते.याकडे विद्यमान सरकार लक्ष देईल का? असा सवाल समस्त दिव्यांग बांधव करीत आहेत.

अलीकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता हा जानेवारी महिना अर्धा संपला तरी देखील अद्यापही दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली नाही. जर अशी तुटपुंजी पेन्शन सुद्धा जर प्रशासन, शासन वेळेत देण्यास हतबल असेल तर संबंधीत अधिकाऱ्यांना येत्या २६ जानेवारी रोजी धारेवर धरून जाब विचारणार असल्याच्या प्रतिक्रिया दिव्यांग व्यक्तींकडून जोर धरू लागल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स