ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी खासदार डाॅ. निलेश राणेंवर गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक करा : युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी खासदार डाॅ. निलेश राणेंवर गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक करा : युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक.

प्रकाशन: 17 Jan 2023 01:39 PM
वाचन संख्या 849

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली पोलिस निरिक्षकांना दिले निवेदन ; आंदोलनाचाही इशारा.

मालवण | सुयोग पंडित : आज सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांनी युवा सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कणकवली पोलिस निरिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेत एक निवेदन दिले.

सुशांत नाईक यांनी निवेदनात माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारायची धमकी दिली असा आरोप करत माजी खासदार डाॅ निलेश राणेंची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी युवा सेनेच्या माध्यमातून मागणी केली आहे.

माजी खासदार डाॅ. निलेश राणेंवर गुन्हा दाखल न झाल्यास युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी निवेदनातून दिला आहे.यावेळी सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर,अनुप वारंग, ॲड. हर्षद गावडे,तेजस राणे, गुरु पेडणेकर, आबू मेस्त्री, संदीप गावकर, निलेश परब,भाई साटम, इमाम नावलेकर,प्रतिक रासम, तात्या निकम, शिंदे आदींसह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स