ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
किशोर चव्हाण यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

किशोर चव्हाण यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 17 Jan 2023 12:34 PM
वाचन संख्या 154

मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत किशोर चव्हाण.

मसुरे | प्रतिनिधी : भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु.किशोर चव्हाण यांना जाहीर झाला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असल्या बद्दल किशोर चव्हाण यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात देण्यात येणार आहे.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे, सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख, सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील, धम्म अभ्यासक विजया कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. मंचकराव डोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई, ॲड. अकबर मकानदार, निती उराडे, प्रा. प्रकाश नाईक उपस्थित असणार आहेत. किशोर चव्हाण यांच्या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स