ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडे येथे शैक्षणिक साहित्य वितरण व गुणगौरव कार्यक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदिवडे येथे शैक्षणिक साहित्य वितरण व गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 16 Jan 2023 02:42 PM
वाचन संख्या 229

ज्ञानसागर विद्यालयाचे शिक्षक व बांदिवडे प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष सोनू सुधाकर सावंत यांचे विशेष मार्गदर्शन.

मसुरे | प्रतिनिधी : देवीचा गोंधळ या धार्मिक कार्यक्रमात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा एक वेगळा उपक्रम बांदिवडे गावात मागील काही वर्षे राबविला जात आहे. मुलांनी चांगला अभ्यास करून स्वतःचे व गावाचे नाव रोशन करावे हाच उदात्त हेतू यामागे आहे.हा उपक्रम यापुढे सुद्धा बांदिवडे प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने राबविला जाईल. शालेय जीवनातच चांगले संस्कार, चांगले विचार आत्मसात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मुंबई येथील ज्ञानसागर विद्यालयाचे शिक्षक व बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सोनू सुधाकर सावंत यांनी येथे केले.


बांदिवडे येथील श्री देवी पावणाई भगवती मंदिर येथे दुसऱ्या वार्षिक गोंधळ कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षा प्रथम दोन क्रमांक विध्यार्थी, नवनिर्वाचित सरपंच, सदस्य सत्कार व अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माध्यमिक शिक्षक सोनू सावंत यांच्या वतीने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विश्वनाथ परब यांनी सोनू सावंत यांच्या दातृत्वा बद्दल आभार मानले.


यावेळी सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी, सदस्य नारायण परब, सौ स्वाती आईर, इतर सदस्य यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच आशु मयेकर, श्री. साई प्रभु, आप्पा गोविंद परब, दिनेश परब, मधुकर परब, आनंद परब, नारायण परब, चंद्रकांत परब, सागर परब, अनिल परब, मनोहर परब, उदय सावंत, आबा आईर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, राजेंद्र परब,जगन्नाथ परब, शिवराम परब, वासुदेव सावंत, अशोक परब, प्रवीण परब, नागेश परब, सौ नीता सोनू सावंत, सौ गौरी प्रथमेश नाईक, प्रथमेश नाईक, राजेश दळवी सिताराम परब, प्रकाश परब, लाडोबा परब, प्रवीण परब, के.के. सावंत, प्रतीक परब, साईप्रसाद प्रभू, नरेंद्र जाधव, नयन भट, विनय सावंत, नितीन परब, अशोक परब, उल्हास परब, विष्णू सावंत, चंद्रशेखर परब, रमेश परब, गणपत सावंत, अनुराधा गावकर, प्रशांत परब, उदय परब, विकास भट, मंगेश चव्हाण, यशवंत परब, उत्तम परब, शैलेश राणे, सुधीर घाडीआदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आनंद परब यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स